Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

कान्हापुरी- पंढरपूर मुक्कामी एस.टी. बस तत्काळ सुरू करण्याची बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी

करकंब : कान्हापुरी ते पंढरपूर या मार्गाची बंद असलेली एसटी बसच्या फेऱ्या तात्काळ सुरू कराण्यात याव्यात तसेच गावातील व आसपासच्या इतर गावातील श...


करकंब : कान्हापुरी ते पंढरपूर या मार्गाची बंद असलेली एसटी बसच्या फेऱ्या तात्काळ सुरू कराण्यात याव्यात तसेच गावातील व आसपासच्या इतर गावातील शेतकऱ्यांना दैनंदिन व्यवहार व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी सतत ये-जा करावी लागते या कोरोनाच्या काळात बंद झालेली मुक्कामी व सकाळच्या वेळीतील एस.टी तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने केली आहे.आगार प्रमुख श्री सुतार यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी एसटी सुरू करतो असे आश्वासन दिले.श्री. सुतार यांना निवेदन देण्यात आले यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर जनहितचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत नलवडे तसेच बळीराजा शेतकरी संघटनेचे पंढरपुर संपर्कप्रमुख रणजित शिंदे, उमाजी खिलारे, अनिल कोळेकर, औदुंबर सुतार, विशाल नलवडे, सुभाष शेंडगे, कृष्णा नलावडे सह शेतकरी उपस्थित होते....