Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

महिलांनी छोटे- मोठे उद्योग सुरू करावेत - रजनीताई देशमुख

करकंब येथील उमेद गटांच्या महिलाना मार्गदर्शन करताना रजनीताई देशमुख, सत्यप्रकाश मेहता, अमृता नगरकर आदी.. करकंब : महिलांनी कौटुंबिक जबाबदारी प...


करकंब येथील उमेद गटांच्या महिलाना मार्गदर्शन करताना रजनीताई देशमुख, सत्यप्रकाश मेहता, अमृता नगरकर आदी..

करकंब :

महिलांनी कौटुंबिक जबाबदारी पार पाडून बचतगटाच्या माध्यमातून आपली स्वप्ने साकार करण्यासाठी छोटे मोठे उद्योग सुरु करावेत, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या व बँकांच्या सहकार्याने आवश्यक भांडवल उभारणी करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्या रजनी ताई देशमुख यांनी दिले.

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त करकंब येथे डिजिटल साक्षरता महिला मेळावा घेण्यात आला. या यावेळी प्रमुख उपस्थिती जि. प. सदस्या रजनीताई देशमुख ह्या होत्या.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात केली.यावेळी सत्यप्रकाश मेहता,कल्पेश शिरसागर, अभिजित अंगरखे, दीपक कदम, अमृता नगरकर, सायली शेटे सुनीता पवार आदींसह महिला उपस्थित होत्या.

विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा करकंब यांच्या कडून रांगोळी स्पर्धा घेऊन योग्य बक्षीस देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच उमेद अभियानातील महिलांच्या २८ गटांना व्यवसायासाठी २८ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले असून आणखी उमेद गटांना कर्ज वाटप केले जाणार आहे.

 या कार्यक्रमासाठी विशेष सोलापूर चे वित्तीय समावेशन अधिकारी सत्यप्रकाश मेहता यांनी अभियानातील सर्व महिलांना बँके विषयी माहिती सांगितली तसेच vkgb बँक मॅनेजर कल्पेश शिरसागर यांनी विमा याबद्दल तर प्रभाग समन्वयक अभिजीत अंगरखे यांनी सर्व स्वयं सहायता समूह महिलेना दशसूत्री, बद्दल माहिती सांगितली. कृषी व्यवस्थापक दिपक कदम यांनी सेंद्रिय शेती, परसबाग,जिवाअमृत तसेच गांडूळखत विषय मार्गदर्शन करीत आभार मानले.


वेळीच कर्जाची परतफेड करावी

करकंब मधील महिलांनी कोरोनाच्या काळात ही उमेद गटांच्या माध्यमातून एकत्र येत व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी जिद्द बाळगली, त्यांना पाच-सहा महिन्यात उमेद कडून व्यवसाय उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज पुरवठा केला जात आहे, त्या कर्जाची परतफेड वेळेत केल्यास आणखी मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा केला जाईल, त्यामुळे महिलांनी वेळेत कर्जाची परतफेड करावी 

रजनी ताई देशमुख, जि.प. सदस्या करकंब गट