Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

कु. आदिती संजय गर्जे हिची नवोदय साठी निवड

उंबरे (पागे) : विद्याविकास मंदिर उंबरे ( पागे) ता.पंढरपूर येथील विद्यार्थीनी कु.आदिती संजय गर्जे हिची जवाहर नवोदय विद्यालय,पोखरापूर येथे निव...


उंबरे (पागे) : विद्याविकास मंदिर उंबरे ( पागे) ता.पंढरपूर येथील विद्यार्थीनी कु.आदिती संजय गर्जे हिची जवाहर नवोदय विद्यालय,पोखरापूर येथे निवड झाली.

चित्र, नृत्य,अभिनय सर्वच कलागुणांत अव्वल असणाऱ्या आदितीने, इयत्ता पहिलीपासूनच मंथन, गुरूकुल, RTSE परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे.

तिला वर्गशिक्षक व्ही.एन.लांडगे सर, तिचे वडील संजय गर्जे सर,आई सुषमा गर्जे व अनेक माजी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

तिचे चौथीपर्यंतचे शिक्षण जि.प. प्राथ. उंबरे केंद्रशाळेत झाले आहे.


तिच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन ज्ञानदेव ढोबळे, गटशिक्षणाधिकारी नाळे साहेब, मुख्याध्यापक बी.जे.शिंदे सर, महादेव शिंदे, ज्ञानदेव कोरके,अमर इंगळे,शहाजी मुळे, संतोष चव्हाण सर, रविंद्र हजारे सर व मॅडम,बांगर सर व मॅडम,बनसोडे सर, इंगोले सर,काव्या गर्जे,सोहम हेंबाडे,स्वरा हेंबाडे व केंद्रातील अनेकांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.