Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जनशक्ती संघटनेच्या पंढरपूर तालुक्यातील पदाधिकार्‍यांच्या निवडी संपन्न

करकंब : जनशक्ती संघटनेच्या विविध विंगच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करकंब येथे संपन्न झाल्या. स्वतः प्रदेशाध्यक्ष अतुलभाऊ खुपसे पाटील यांनी या ...करकंब : जनशक्ती संघटनेच्या विविध विंगच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करकंब येथे संपन्न झाल्या. स्वतः प्रदेशाध्यक्ष अतुलभाऊ खुपसे पाटील यांनी या निवडी करून निवडीचे पत्र पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.


जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून ऊस वाहतूकदारांची पहिल्यांदाच मोट बांधत असून कारखाना पातळीवर या संघटना होत्या परंतु संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर अशी संघटना नव्हती त्यामुळे ऊस वाहतूकदारांचे अनेक प्रश्न गेले कित्येक दिवस प्रलंबित आहेत. त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, अनेक दिवसांपासून या घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जनशक्ती संघटना सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अतुलभाऊ खुपसे यांनी सांगितले.यावेळी खालील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.

१)गणेश गोविंद लामकाने रा. पिराची कुरोली ता. पंढरपूर : युवक जिल्हा अध्यक्ष पंढरपूर विभाग

२) गणेश भिवा ढोबळे रा. उंबरे पागे : युवा पंढरपूर तालुका अध्यक्ष

ऊस वाहतूक संघटना 

बालाजी ज्ञानदेव धायगुडे रा. करकंब : पंढरपूर तालुकाध्यक्ष

भगवान विलास नाईकनवरे रा. पटवर्धन कुरोली : पंढरपूर तालुका उपाध्यक्ष 

राजेंद्र बाळु कणसे : सोशल मिडिया प्रमुख पंढरपूर

हनुमंत उत्तम भुसनर, पेहे : पंढरपूर तालुका उपाध्यक्ष

उज्वल वसंत ठोंबरे, करकंब : करकंब विभाग प्रमुख

दिलीप तुळशीराम शेटे , : करकंब विभाग प्रमुख 

विठ्ठल हरिदास जाधव,  करकंब :  पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष 

पोपट ज्ञानेश्वर कोरके रा. पेहे : पंढरपूर तालुका उपाध्यक्ष 


पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत महाराष्ट्रभर सायकलवर प्रवास करणारी युवती प्रणाली ताई  चिकटे यांचा जनशक्ती ने केला सन्मान 

प्रणाली ताई चिकटे सायकलवरून प्रवास करत करकंबला आल्या आहेत हे समजताच निवडीच्या बैठकीत त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच पुढील प्रवासासाठी आर्थिक मदतही देऊ केली. उपस्थितांना यावेळी प्रणाली ताईंनी पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.