Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

अज्ञात कारणावरून वृद्ध महिलेचा खून

करकंब:- आव्हे ता. पंढरपूर येथील राजश्री शिवदास बिडवे वय 65  या वृद्ध महिलेचा खून करून प्रेत ऊसात पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रय...

करकंब:- आव्हे ता. पंढरपूर येथील राजश्री शिवदास बिडवे वय 65  या वृद्ध महिलेचा खून करून प्रेत ऊसात पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असून याबाबत अज्ञात व्यक्ती विरुद्ध करकंब पोलिसात फिर्याद दाखल झाली आहे.
   याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 22 मे रात्री सव्वा दहा ते 27 मे साडे बारा वाजण्याच्या दरम्यान राजश्री शिवदास बिडवे या महिलेला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून जीवे ठार मारले असून पुरावे नष्ट करण्यासाठी महिलेच्या वापरातील गादी व ब्लॅंकेट विहिरीत टाकलेली आढळून आली आहेत. महिलेचा मृतदेह हा येथील गट नंबर 164 मधील ऊसाच्या पिकाच्या सरीत पुरून नष्ट करण्यात आला असल्याबाबत मुलगी कोमल कांबळे हिने करकंब पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात इसमाविरोधात करकंब पोलिसात गुरन नंबर 127/2024 भा.द.वी. कलम 302,201 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास स.पो.नि. सागर कुंजीर हे करीत आहेत.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले,अप्पर तहसीलदार,पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण सोलापूर यांनी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली.