Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब येथे आज जेष्ठ संगणक शास्त्रज्ञ, पद्मश्री, पद्माविभुषण, महाराष्ट्र भुषण डॉ. विजय भटकर सर यांचे व्याख्यान

करकंब येथे आज जेष्ठ संगणक शास्त्रज्ञ, पद्मश्री, पद्माविभुषण, महाराष्ट्र भुषण डॉ. विजय भटकर सर यांचे व्याख्यानाचे आयोजन बेदाणा उत्पादन तंत्रज...


करकंब येथे आज जेष्ठ संगणक शास्त्रज्ञ, पद्मश्री, पद्माविभुषण, महाराष्ट्र भुषण डॉ. विजय भटकर सर यांचे व्याख्यानाचे आयोजन

बेदाणा उत्पादन तंत्रज्ञान व विक्री मार्गदर्शन संधी मेळावा व विद्यार्थीसाठी प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन 

करकंब प्रतिनिधी :-येथील रोटरी क्लब ऑफ करकंब व सदभावना सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करकंब व परिसरातील विद्यार्थी आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ , पद्मश्री , पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण डॉ. विजय भटकर तसेच नानासाहेब कदम यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान- आज 27 डिसेंबर रोजी, दुपारी-3 ते 5 पर्यंत सुवर्ण मंगल कार्यालय, मोडनिंब रोड , करकंब. येथे आयोजित केले आहे.

          सदर या व्याख्यानमालेस करकंब व परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि विद्यार्थी यांनी जास्तीत -जास्त उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे अवाहन करकंब रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. रघुनाथ जाधव. अध्यक्ष- रोटरी क्लब ऑफ करकंबचे सचिव रो. डॉ. अक्षय मोरे व सर्व रोटरी सदस्य तसेच सद्भावना सेवा मंडळाचे अध्यक्ष राजेश शाह , सचिव सतीश दुधाणे सर्व सद्भावना सेवा मंडळ सदस्य यांनी केले आहे.




संगणक शास्त्रज्ञ, पद्माश्री, पद्माभूषण डॉ. विजय भटकर यांचा जीवन प्रवास

*जन्म - ११ ऑक्टोबर १९४६

*जन्मगाव -  मुरंबा, ता. मूर्तिजापूर जि. अकोला

मुरंबा हे अडीचशे-तीनशे लोकवस्तीचे गाव. 

 त्यांचे मूळ घर जनावरांचा गोठा आणि पडक्या भिंती असलेल्या जुनाट वाड्यात.

शिक्षण -

इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग - विश्वेश्वरय्या रीजनल इंजिनीअरिंग कॉलेज, नागपूर

एम.टेक -  महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, वडोदरा

पी.एचडी. - आयआयटी, दिल्ली 


*नोकरी व काम -

 

सन १९६८ विक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स कमिशनची स्थापना त्या कमिशनवर भटकरांनी दहा वर्षे काम केले

सन १९७२ इंदिरा गांधींनी 'इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार' साठी नेमलेल्या महत्त्वाच्या समितीचे सदस्य होते


 त्रिवेंद्रममध्ये इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट या भारतातील सर्वात मोठया प्रयोगशाळेची स्थापना केली. या संस्थेचे १९८० ते१९८७ या काळात ते संचालक होते. 

भटकरांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नांची पराकाष्ठा करून भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे १९८२ साली हे उद्दिष्ट पूर्ण केले. 

सन १९८७ भटकर टाटा कन्सल्टन्सीत उपाध्यक्ष झाले. 

सन १९९३ मध्ये भटकर सरांनी परम-८०० तर १९९८मध्ये परम-१००० हे संगणक बनवले. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. हा संगणक प्रति सेकंद एक अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी हा संगणक उपयोगी पडतो. विकसनशील देशातील असा हा एकमेव संगणक आहे. एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका आणि जपान सोडता फक्त भारतात आहे. 

भटकर सरांनी पुण्यातील सी-डॅकमध्ये (Centre for Development of Advanced Computing) प्रगत संगणकीय शिक्षण केंद्र सुरू करून हजारो मुलांना संगणकाचे शिक्षण दिले. 

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ही पदव्युत्तर शिक्षणाची संस्था त्यांनी स्थापन केली. 

शाळेपर्यंत न पोचणाऱ्या मुलांसाठी 'एज्युकेशन टू होम' (ईटीएच) ही संकल्पना मांडून त्यासाठी १९९८-९९ मध्ये ईटीए संशोधन शाळा सुरू केली. 

महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेततेसाठी त्यांनी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपला संगणकीय प्रणाली बनवून दिली. 

ग्रामीण भागात संगणक शिक्षणाचा प्रसार अधिक होण्यासाठी डिजिटल स्कूल काढून त्याद्वारे वीस लाख लोकांना शिक्षण दिले. 

त्यांनी घरात येणाऱ्या एकाच वायरमधून आपल्याला फोन-टीव्ही आणि संगणक चालवता येतील अशी ब्रॉडबँड प्रणाली विकसित केली. 

भटकरांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, डीव्हीनेट, मल्टिया, डिशनेट या संस्थाही स्थापन केल्या. 

सन्मान आणि पुरस्कार -

आणासाहेब चिरमुले स्मृति पुरस्कार- २००३

इंडियन जिओटेक्निकल सोसायटी- सुवर्णपदक, १९७९

इलेक्ट्रॉनिक मॅन ऑफ द इयर -१९९२- ELCINA

ईबिझ इनोव्हेशन कॉन्टेस्ट पुरस्कार -दुबई, १९९८. (या स्पर्धेला ३५ देशातून १३२५ जण आले होते, त्यांत भटकर सर हे पहिले आले.)

एच्‌के फिरोदिया जीवनगौरव पुरस्कार- १९९५-९६

एन्आर्‌डीसी पुरस्कार-१९८१

ओम प्रकाश भसीन पुरस्कार-२०००

कृतज्ञता पुरस्कार -

केजी प्रतिष्ठानचा दशकातील व्यक्तिमत्त्व पुरस्कार -२००४

गुलाबराव महाराज पुरस्कार -

दानाक्वेस्ट जीवनगौरव पुरस्कार -२००३

पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा(PMCIL) पुरस्कार -२००१

पिटर्सबर्ग पारितोषिक -२००४

पुणे अभिमान मूर्ती -१९९७

पुणे सिटाडेल पुरस्कार -

पुण्यभूषण पुरस्कार -

प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार -१९९४(I.I.T, Delhi)

प्रियदर्शिनी पुरस्कार -२०००

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स(FICCI) -१९८३, १९९१.

भारत सरकारकडून पद्मश्री -२०००

महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार -२०००

भारत सरकारकडून पद्मभूषण -२०१५

राजर्षि शाहू महाराज पुरस्कार -

रामियल वाधवा सुवर्णपदक -१९९२(IETE)

रोटरी पुरस्कार -१९९७

लोकमान्य टिळक पुरस्कार -१९९९

विदर्भ गौरव पुरस्कार -

विदर्भ भूषण पुरस्कार -

विविधलक्षी औद्योगिक विकास केंद्राचा(VASUIK) पुरस्कार -१९९३

विश्वरत्‍न पुरस्कार -

विश्वेश्वरय्या स्मृति पुरस्कार -२००२(कोल्हापूर)

विज्ञानगौरव पुरस्कार -

सरस्वती पुरस्कार -

सावरकर राष्ट्रीय स्मारक विज्ञान पुरस्कार -

सीडॅक-एसी‍एस प्रतिष्ठान व्याख्यान पुरस्कार -२००७

श्रीमंत मालोजीराव स्मृति पुरस्कार -

हायग्रीव्ह पुरस्कार वगैरे.