Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब च्या, SSC मार्च 2001 च्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस एक लाख किंमतीचा आरो फिल्टर भेट

रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब च्या, SSC मार्च 2001 च्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस एक लाख किंमतीचा आरओ फिल्टर भेट ---------------------------...


रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब च्या, SSC मार्च 2001 च्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस एक लाख किंमतीचा आरओ फिल्टर भेट

----------------------------------

स्नेहमेळावा..2000-01

25 डिसेंबर 2022

आज रोजी, डी. ए. व्ही. शिक्षण संस्थेचे करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल, करकंब या विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या आनंदी वातावरणात, सुंदर आणि शिस्तबध्द सूत्रसंचालन, योग्य नियोजनाने, मोठ्या उत्साहाने सन 2000-01 च्या एसएससी  बॅच चा स्नेहमेळावा संपन्न झाला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आदरणीय मा. मुख्याध्यापक श्री. सहस्त्रबुध्दे सर म्हणून लाभले. तसेच अध्यक्ष स्थानी  शाळेचे पर्यवेक्षक श्री. करळे सर उपस्थित होते.

या वेळी सर्व प्रथम सर्व माजी विद्यार्थी व गुरुजनांचे गुलाब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, नंतर सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रस्तावना अश्विनी चंदनशिवे हिने केली,

यानंतर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, श्री. एम. आर. सहस्त्रबुध्दे सर, 

आदरणीय श्री. गायकवाड सर, श्रीमती शिंदे मॅडम, श्री. मळेगावकर सर, श्री. गव्हाणे सर, श्री. करळे सर, श्री. पूजारी सर, श्री. यबुते सर,श्री. शिंदे सर,श्री.पंचवाडकर सर , सौ. ढोबळे मॅडम, शिंगटे  मॅडम, शेख मॅडम आदी गुरुजनांचा सत्कार करण्यात आला.


उपस्थित सर्व गुरुजनांनी मार्गदर्शन केले.

यानंतर प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी स्वतः ची ओळख सांगून आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये श्री. अभय देशमुख, सविता मुंनोळी, दत्तात्रय कांबळे, निलेश घाडगे, दीपक ग्याले,विवेक शिंगटे  इत्यादी माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

व चालू परिस्थिती मधील शाळेचे बदलते रूप व गुणवत्ता पाहून समाधान व्यक्त केले.

सदर प्रसंगी माजी विद्यार्थ्यांकडून रामभाऊ जोशी हायस्कूल साठी विद्यार्थ्यास पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी  सोय व्हावी, ही गरज ओळखून तसेच विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यास मिळावे म्हणून (90,000₹) आर. ओ. फिल्टर व पाण्या ची टाकी(10,000₹) असे एकूण एक लाख रुपये ची भेट देण्यात आली. यानंतर सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्न्हेहभोजनाचा आस्वाद घेतला.

यानंतर, शिक्षकांशी गप्पा तसेच एकत्र बसून एकमेकांची विचारपूस व गाण्यांची मैफील जमली

यामुळे कार्यक्रमाला एक रंगतदार बहार आली.सदर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता मुंनोळी व आशा कळेल यांनी केले. तसेच सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एसएससी मार्च 2001 च्या प्रत्येक माजी 

विद्यार्थ्यांनी सर्वतोपरी विशेष परिश्रम घेतले.

गुरुजनांची व माझी विद्यार्थ्यांची उपस्थिती हेच आजच्या कार्यक्रमाला आनंद देणारी गोष्ट ठरली. पुढील भेटीचे आवाहन करून प्रत्येकजण तृप्त मनाने जुन्या आठवणीत रमून आपापल्या घरी परतले.