Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

भक्ति ज्ञान वैराग्य हे परमार्थाचे भक्कम खांब आहेत:-राणी सिदवाडकर श्रीकृष्ण जन्मकथा करकंबकर भक्तभाविक भक्तिरसात चिंब भागवत कथेचे ४ थे पुष्प

  भक्ति ज्ञान वैराग्य हे परमार्थाचे भक्कम खांब आहेत:-राणी सिदवाडकर श्रीकृष्ण जन्मकथा करकंबकर भक्तभाविक भक्तिरसात चिंब भागवत कथेचे ४ थे पुष्प...

 


भक्ति ज्ञान वैराग्य हे परमार्थाचे भक्कम खांब आहेत:-राणी सिदवाडकर


श्रीकृष्ण जन्मकथा करकंबकर भक्तभाविक भक्तिरसात चिंब

भागवत कथेचे ४ थे पुष्प

करकंब आज कै. पुष्पा नारायण दुधाने यांच्या प्रथम पुण्यसपणार निमित्त व कै. नारायण पंढरीनाथ दुधाणे यांच्या स्मृतिपित्यर्थ आयोजित चौथ्या दिवसाच्या श्रीमत् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्यामध्ये ह.भ.प.राणीताई सिदवाडकर यांनी सांगितले.


सुरुवातीला मनोज पवार. लक्ष्मण वंजारी. संदीप पलंगे. राजेंद्र करपे. प्रमोद रेडे. कांतीलाल चित्राव. धनंजय इदाते, ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या शुभहस्ते चौंडेश्वरीमाता व भागवत ग्रंथाची पूजा करून सर्वांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन झाले.मनोज पवार व राजेंद्र करपे यांचा सत्कार करण्यात आला, त्यानंतर भागवत कथा प्रारंभ झाली सुरुवातीच्या भागवताच्या आरतीनंतर सांगितले की मनुष्याच्या जीवनात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य येण्यासाठी मनुष्याने सदैव भगवंतावर प्रेम केलं पाहिजे,संतही सुख मागतात आणि संसारी ही सुख मागतात परंतू यांच्या मागण्या मध्ये खुप फरक असून प्रापंचिक लोक आपल्या सुखासाठी सुखाची मागणी मागतात पण हे संत इतरांच्या सुखासाठी सुखाची मागणी करतात,कुळी कन्या पूत्र होती जे सात्विक तारांचा हारिक वाटे जीवा, परिक्षीत राजांनी शुखदेव भगवंतांना अनेक प्रश्न विचारले, तिसऱ्या स्कंदापासून दहाव्या स्कंदापर्यत कथा सांगत असताना विदुर महाराज श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी भजन करत भगवंत विदुराच्या कन्या खात होते ही भक्तीची ताकत आहे, मनुष्याने आयुष्यात मिळवलेले धनही कष्टाने मिळवलेल पाहिजे,त्यानंतर ध्रुव बाळाची कथा सांगितली,तसेच संत कुर्मदासाची कथा सांगितली अनेक दृष्टांत देऊन कथेच्या शेवटी श्रीकृष्ण जन्मकथा सांगत असताना दृष्ट कंसान वसुदेव देवकी सात मुलांना क्रुरतेन मारलं पण आठवा कृष्ण तुझा वध करण्यासाठी जन्म घेतोय अशी आकाशवाणी झाली,आणि श्रीकृष्ण जन्माचा आनंद करकंबकर वासीयांनी आनंदने नाचून साजरा करत श्री संजीवकुमार म्हेत्रे यांनी वासुदेवाची भुमिका साकारत सजीव देखावा सादर करुन एक स्वर्गीय सुखाचा आनंद साजरा करत फुगड्या खेळत आनंद साजरा केला.




https://youtu.be/fd2XB-FFrOg


यावेळी अनेक बालकलाकारांनी श्रीकृष्ण भुमिका साजरा करून आपल्या लेकराच कौतुक पाहायला आयांनी गर्दी केली होती,सदर भागवत कथा ऐकण्यासाठी करकंबकरांनी हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला,भागवत कथेला ही  साथसंगत नामदेव आघाव,ज्ञानेश्वर रहाटे,रमेश बीटे,ज्ञानेश्वर पिसे,यांनी अतिशय सुंदर केली, भागवत कथा यशस्वी करण्यासाठी जोतिराम सिदवाडकर, श्रीराम प्रतिष्ठान चे मिलिंद उकरंडे विजय भागवत,धनंजय इदाते नवनाथ आलेकर,तसेच मोहन बोधे, बाळासाहेब घाडगे,सचिन मुजमुले,विशाल बोधे संतोष बुगड,आदी विशेष परिश्रम घेत आहेत तसेच ज्ञानेश्वर दुधाणे गणेश दुधाणे या बंधूंच्या अप्रतिम नियोजनबध्द कार्यक्रम कर कंबकरांना मनापासून  श्रवण करायला मिळत आहे,यांची जाणीव प्रत्येक भाविकांच्या चेहऱ्यावर दिसत होती,पुढे आणखी तीन दिवस चालणाऱ्या या भागवत कथेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन दुधाणे बंधूंनी केले आहे.

फोटो सौजन्य:- साई डिजिटल रुपेश सदावर्ते करकंब