Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब मध्ये विविध ठिकाणी गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी

करकंब प्रतिनिधी. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची 66 वी पुण्यतिथी करकंब मध्ये विविध ठिकाणी  सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली.  करकंब येथील ग्र...


करकंब प्रतिनिधी.

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची 66 वी पुण्यतिथी करकंब मध्ये विविध ठिकाणी  सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. 

करकंब येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करकंब पोलीस स्टेशनचे सहायक  पोलीस निरीक्षक निलेश तारू व महेश मुंडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी करकंब गावचे उपसरपंच आदिनाथ देशमुख, ग्रामपंचायत सदस्य विवेक शिंगटे, बहुजन ब्रिगेडचे राजेंद्र खरे ,महेंद्र शिंदे, मुस्ताक बागवान, आदी मान्यवर उपस्थित होते.

करकंब येथील स्मशानभूमीची स्वच्छता व त्या ठिकाणी तीन हजार लिटरची सिमेंटची पाण्याची टाकीची सोय व लोकांना बसण्यासाठी कट्टा बांधण्याचे पूजन करण्यात आले.

परीट समाजाचे महाराष्ट्राचे युवक  उपाध्यक्ष सचिन शिंदे व सर्व समाज बांधव व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी सोमनाथ शिंदे, गणेश साळुंखे, नागेश साळुंखे, सोमनाथ गायकवाड, सोनू शिंदे उपस्थित होते.

गावातील माध्यमिक विद्यालय, प्राथमिक शाळा या ठिकाणी गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

करकंब येथील क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन प्रसंगी सर्व जिल्हा परिषद शाळांचे शिक्षकांच्या वतीने गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळेस केंद्रप्रमुख आप्पा माळी,  खंदारे, बागवान  प्राध्यापक सतीश देशमुख व सर्व शिक्षक  वृंद उपस्थित  होते.