Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

रामभाऊ जोशी हायस्कूलचे आठ स्काऊट यांचा (भोर) पुणे येथील राज्य पुरस्कार चाचणीत सहभाग.

  ‌                     महाराष्ट्र राज्य भारत प्रशिक्षण केंद्र भोर येथे झालेल्या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार  परीक्षा अतिशय आनंदी शिस्तबद्ध व...

  ‌                   

महाराष्ट्र राज्य भारत प्रशिक्षण केंद्र भोर येथे झालेल्या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार  परीक्षा अतिशय आनंदी शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाले या प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख दिलीप नेवसे यांच्या नेतृत्वाखाली नगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यातून आलेल्या 206 स्काऊट यांचे राज्य पुरस्कार चाचणी परीक्षा संपन्न झाल्या या परीक्षेमध्ये रामभाऊ जोशी हायस्कूलच्या आठ विद्यार्थ्यांनी राज्य पुरस्कार चाचणी शिबिर अतिशय उत्कृष्टपणे दिले. यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या 22 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या चार दिवसीय परीक्षेत विविध प्रकारचे परीक्षा व मूल्यमापन करण्यात आले या परीक्षेमध्ये तोंडी,लेखी व प्रात्यक्षिक अशा विविध प्रकारच्या परीक्षा घेण्यात आले. या सहभागी विद्यार्थ्यांना स्काऊट शिक्षक महादेव पुजारी, मुख्याध्यापक हेमंत कदम, सोलापूर जिल्हा स्काऊट संघटक श्रीधर मोरे, जिल्ह्य ट्रेनिंग कमीशनर शंकरराव यादव यांचे मार्गदर्शन लाभले.

राज्य पुरस्कार परीक्षेतील करकंबचे आठ विद्यार्थी  ‌१) कुंभार रोहन अशोक. २)शिंदे अथर्व विलास. ३)गुजरे रूद्र रविंद्र. ४)शिंगटे रोहित अमोल. ५) मोहिते कुणाल सुनिल. ६)लोकरे विवेकानंद दत्तात्रय. ७) जगताप विक्रम सुनिल. ८) कुंभार शिवरत्न दत्तात्रय.