Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

भाषा चांगले जीवन जगायला शिकवते - प्रा. डॉ. रामचंद्र कोरडे ; आपटे उपलप प्रशाला जिल्ह्यात द्वितीय

           पंढरपूरः येथील आपटे उपलप प्रशालेने रिड टू मी सॉप्टवेअर ह्या अँड्रॉईड ॲपचा वापर करून प्रभावी काम केल्याने महाराष्ट्र शासन व इंग्लि...

         


 पंढरपूरः येथील आपटे उपलप प्रशालेने रिड टू मी सॉप्टवेअर ह्या अँड्रॉईड ॲपचा वापर करून प्रभावी काम केल्याने महाराष्ट्र शासन व इंग्लिश हेल्पर या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रशालेचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान केला. आपटे उपलप प्रशाला ही जिल्ह्यात हे ॲप सर्वाधिक वापर करणारी द्वितीय क्रमांकाची शाळा ठरली.


          यावेळी आपल्या मनोगतात  डॉ. कोरडे यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधत भाषेचे महत्व पटवून दिले.

         यावेळेस मान्यवरांच्या हस्ते प्रशालेचे मुख्याध्यापक श्री हरिदास सर,पर्यवेक्षक श्री धारूरकर सर यांना स्मृती चिन्ह प्रदान करण्यात आले. इंग्रजी विषय शिक्षक अनिल जाधव सर यांनी यशस्वी उपक्रम राबवल्या बद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण सोलापूर चे प्राचार्य मा डॉ. रामचंद्र कोरडे सर यांनी प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.

        या कार्यक्रमास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण सोलापूरचे प्राचार्य मा डॉ. रामचंद्र कोरडे सर , विस्ताराधिकारी मा. लिगाडे साहेब , पंढरपूर तालुका विषय साधन अधिकारी मा. आप्पासाहेब तौर सर , रिड टू मी प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्री कार्तिकस्वामी देवमाने सर यांच्या विशेष उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 


         सरस्वती पूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत प्रशालेच्या कार्याचे कौतुक केले. आपटे उपलप प्रशाला ही नेहमी नवनवीन उपक्रम राबवण्यास नेहमी अग्रेसर असते हे ॲप विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी खूप उपयोगी पडत आहे असे मुख्याध्यापक श्री हरिदास सर यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अभंगराव सर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री भातलवंडे सर यांनी करून दिला. प्रशालेचे पर्यवेक्षक श्री धारूरकर सर यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री खरात सर यांनी केले. यावेळी इंग्रजी विषय शिक्षक तसेच जेष्ठ शिक्षक गुलाखे सर, चांडोले सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्या विकास मंडळाचे सचिव मा.श्री. बी.जे. डांगे यांनी प्रशालेने मिळविलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.