Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर वतीने स्थानिक कलाकारांना सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी व्यासपीठ

नटराज क्लासेसच्या गुरु लक्ष्मी बडवे यांचा सन्मान करतांना सदस्या शकुंतला नडगिरे मॅडम व शिष्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर वतीने...



नटराज क्लासेसच्या गुरु लक्ष्मी बडवे यांचा सन्मान करतांना सदस्या शकुंतला नडगिरे मॅडम व शिष्या


श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर वतीने स्थानिक कलाकारांना सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी व्यासपीठ



प्रतिवर्षाप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर आयोजित नवरात्र संगीत महोत्सवात पंढरपूर येथील स्थानिक कलाकारांनाही व्यासपीठ मिळवून देऊन सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रयत्न केला जातोय ही खुप मोठी गोष्ट आहे,सह अध्यक्ष मा.ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर व सन्माननीय सदस्य, कार्यकारी अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी श्री संजीव जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या नवरात्र संगीत महोत्सवात स्थानिक कलाकारांना संधी देत भरतनाट्यम  गुरु सौ. लक्ष्मी नारायण बडवे यांच्या सर्व शिष्यांना आपलं भरतनाट्यम् कला रुक्मिणी माते समोर आपली कला  सादर करण्यासाठी संधी मंदिर समीतीच्या वतीने देण्यात आली, त्यामुळे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळतेय, पंढरपूर कला रसिक मोठ्या संख्येने मंदिर समितीचे अभिनंदन व्यक्त करीत आहेत, भरतनाट्यम मध्ये सर्व शिष्यांनी नर्तन गणपती,आईगिरी नंदिनी,गुरु अष्टक,देवी कीर्तनम,गरुड गमन,भो शौभो,अशी अनेक भरतनाट्यम मधील प्रकार सादर करत शेवटी भेरवीत मिले सुर मेरा तुम्हारा नृत्यांने कार्यक्रमाची सांगता केली.यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे मॅडम यांचे शुभहस्ते नटराज क्लासेसच्या  गुरु लक्ष्मी बडवे मॅडम यांचा विठ्ठल रुक्मिणी मातेची शाल व प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला,यामध्ये अनेक शिष्या विशारद झाल्या त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले,या कार्यक्रमाला लक्ष्मी बडवे यांच्या ४०शिष्यांनी सहभाग नोंदवून अप्रतिम भरतनाट्यम नृत्य सादर केले.यावेळी शुभम जवंजाळ यांची ध्वनी व्यवस्थाही सुंदर असल्याने कार्यक्रम अधिक उठावदार झाला यावेळी मुलींचे पालक रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.असेच सुंदर कार्यक्रम प्रत्येक वर्षी मंदिरे समितीने सादर करावेत अशी भावना कला रसिक वर्गातून होत आहे.