Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब येथे वन्यजीव सप्ताह निमित्त विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण रामभाऊ जोशी हायस्कूल च्या राष्ट्रीय हरित सेनेचा उपक्रम

करकंब येथे वन्यजीव सप्ताह निमित्त विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण संपन्न    रामभाऊ जोशी हायस्कूल च्या राष्ट्रीय हरित सेनेचा उपक्रम       दि...

करकंब येथे वन्यजीव सप्ताह निमित्त विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण संपन्न   







रामभाऊ जोशी हायस्कूल च्या राष्ट्रीय हरित सेनेचा उपक्रम      

दि.6ऑक्टोंबर.                 

         महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभाग (परीक्षेत्र) पंढरपूर आणि रामभाऊ जोशी हायस्कूल येथील राष्ट्रीय हरित सेनेच्या  वतीने वन्यजीव सप्ताह निमित्त आयोजित केलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ दयानंद शिक्षण संस्थेच्या रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब येथे संपन्न झाला.या बक्षिस वितरण समारंभास  प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम, सामाजिक वनीकरण विभाग पंढरपूर परिक्षेत्र विभागाचे वन अधिकारी समाधान पाटील, एस.ए.कळसाईत, पर्यवेक्षक धनवंत करळे, राष्ट्रीय हरीत सेनेचे समन्वयक महादेव पुजारी,जेष्ठ शिक्षक संजय पंचवाडकर यांच्या उपस्थितीत वन सप्ताह निमित्त आयोजित केलेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. विद्यार्थ्यांनी काढलेल्या *"माझा आवडता वन्यजीव"* चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.       


  निबंध स्पर्धा.....                     

कु.पूर्वा आदिनाथ देशमुख(प्रथम),

कु. पूर्वी रवींद्र मोहिते(द्वितीय)

कु. ज्ञानेश्वरी सुनील धोत्रे(तृतीय)

कु. स्वरा विशाल रेपाळ(उत्तेजनार्थ).         

चित्रकला स्पर्धा.....                

कु.अनुष्का महादेव पुजारी(प्रथम),

कु.गौरी अनिल वसेकर(द्वितीय),

चि. युवराज रामचंद्र जाधव(तृतीय) 


यावेळी प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम यांनी      सर्व विद्यार्थ्यांना वन्यजीव सप्ताह निमित्त परिसंस्थेतील अन्नसाखळीचे महत्व आणि एखादा वन्यजीव परिसंस्थेतून कमी झाल्यानंतर त्यामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी माहिती सांगितले. सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी समाधान पाटील यांनी जैवविविधतेतून लुप्त होत असणाऱ्या  वन्यजीवांचे प्रजाती याविषयी सर्व विद्यार्थ्यांना सखोल माहिती सांगितली.      


या स्पर्धेचे परीक्षण प्रशालेतील मराठी विभाग प्रमुख सुरेश दहिगिरे, कलाशिक्षक संजय पंचवाडकर यांनी केले.


साप्ताहिक करकंब दर्शन दिवाळी विशेषांक २०२२ साठी आपले लेख कविता विनोद पाककृती सुविचार पाठवा.

बातमी अणि जाहिराती साठी संपर्क:

9011634250