Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

ऊस दर संघर्ष समितीची पटवर्धन कुरोली मध्ये बैठक संपन्न...

 ऊस दर संघर्ष समितीची पटवर्धन कुरोली मध्ये बैठक संपन्न...      पंढरपूर ‌... पटवर्धन कुरोली येथे ऊस दर संघर्ष समितीचे बैठक संपन्न झाली यामध्य...

 ऊस दर संघर्ष समितीची पटवर्धन कुरोली मध्ये बैठक संपन्न...

     पंढरपूर ‌... पटवर्धन कुरोली येथे ऊस दर संघर्ष समितीचे बैठक संपन्न झाली यामध्ये शेतकऱ्याला मिळणारा ऊस दर उत्पादन खर्च आधारित मिळाला पाहिजे कारखानदार शेतकऱ्यांचे करत असलेले शोषण वाढती महागाई या मुद्द्यावर आपले विचार व्यक्त केले वास्तविक पाहता खताच्या किमती भरमसाठ वाढल्याने शेतकऱ्यांना ऊस दर योग्य मिळावा यासाठी पंढरपूर तालुक्यातील गावोगावी ऊस दर संघर्ष समितीने 23 तारखेला होणाऱ्या ऊस परिषदेचे निमंत्रण प्रत्येक गावात जाऊन दिलेला आहे...

ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना या ऊस परिषद साठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन ऊस दर संघर्ष समितीचे दीपक भोसले, समाधान फाटे नितीन बागल,तानाजी बागल,सचिन पाटील, माऊली जवळेकर, सचिन आटकळे, रणजित बागल, शहाजान शेख, बाळूमामा जगदाळे,सोमनाथ गायकवाड यांनी केले...

यावेळी पांडुरंग अण्णा नाईकनवरे, कांतीलाल नाईकनवरे, जगदीश पाटील प्रतापसिंह चंदनकर, सिद्धेश्वर नाईकनवरे, गणेश देशमुख, संभाजी उपासे सूत्रसंचालन महादेव नळे तर पांडूरंग नाईकनवरे यांनी आभार मानले  मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते...

चौकट-सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम वेळेवर आणि रास्त द्यावा,शेतकर्यानी उसाला सांगली कोल्हापूर प्रमाणे दर मिळण्याची साठी ऊस दर संघर्ष  समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ऊस परिषदेला पंढरपूर येथे उपस्थित रहावे.