Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

आपटे उपलप प्रशालेत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यास रोटरी तर्फे सायकल भेट

पंढरपूर: आपटे उपलप प्रशाला, पंढरपूर येथे इ. ६ वीत शिकणारा विद्यार्थी चि. अथर्व नवनाथ क्षीरसागर यास रोटरी क्लब ऑफ पंढरपूर व रोटरी क्लब चे माज...


पंढरपूर: आपटे उपलप प्रशाला, पंढरपूर येथे इ. ६ वीत शिकणारा विद्यार्थी चि. अथर्व नवनाथ क्षीरसागर यास रोटरी क्लब ऑफ पंढरपूर व रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष रो. किशोर निकते यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगाची सायकल भेट देण्यात आली.
शिकण्याची जिद्द आहे परंतु दिव्यंगत्वामुळे अथर्व यास शाळेत येण्यास पालकांच्या मदतीने यावे लागत होते. प्रशालेचे मुख्याध्यापक व रोटरीचे माजी अध्यक्ष जयंत हरिदास यांच्या प्रयत्नातून व रोटरीच्या माध्यमातून त्यास सायकल भेट देण्यात आली.
यावेळी रोटरी क्लब ऑफ पंढरपूरचे रो. सचिन भिंगे, मा. अध्यक्ष किशोर निकते, मा. सचिव रो. किशोर सोमाणी इ. रोटरीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे जेष्ठ शिक्षक अनिल अभंगराव यांनी केले, उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक जयंत हरिदास यांनी केले. 
रो. किशोर निकते यांनी यापुढेही सर्वार्थाने प्रशालेस सहकार्य करू असे आश्वासित केले. विद्या विकास मंडळाचे सचिव बी.जे. डांगे सर यांनी रोटरी क्लब ऑफ पंढरपूरचे आभार व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. पर्यवेक्षक दत्तात्रय धारूरकर यांनी आभार मानले.यावेळी संस्थेचे सदस्य एन.पी. डांगे, बी.एच. गुलाखे, राहूल भातलवंडे यांसह प्रशालेतील शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.