Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

रामभाऊ जोशी हायस्कूल येथे जागतिक पर्यटन दिवस अनोख्या पध्दतीने साजरा

रामभाऊ जोशी हायस्कूल येथे जागतिक पर्यटन दिवस अनोख्या पध्दतीने साजरा        आज जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने....                        ...

रामभाऊ जोशी हायस्कूल येथे जागतिक पर्यटन दिवस अनोख्या पध्दतीने साजरा       


आज जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने....                                            फुलपाखरू.....                                      आपण पाहूया... ‌ सर्वांना दाखवू या          

करकंब.. २७ सप्टेंबर...                     

रामभाऊ जोशी हायस्कूल, करकंब येथील राष्ट्रीय हरित सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळाच्या वतीने २७ सप्टेंबर जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने "चला विविध फुलपाखरू पाहु या"... हा पर्यावरणपूरक उपक्रम साजरा....                                   पर्यावरणातील अत्यंत महत्वाचा किटकामधील आकर्षक किटक म्हणजे फुलपाखरे जगात सर्वत्र आढळतात. त्यांचे पंख नाजूक व विविधरंगी असल्यामुळे ती मोहक दिसतात. प्रतिवर्षी पावसाळ्यात आपणास फुला झाडांच्या बागेत विविध रंगी चित्रविचित्र नक्षीनेयुक्त असलेल्या पंखांची फुलपाखरे सगळीकडे दिसतात. महाराष्ट्रात आढळणाऱ्या फुलपाखरांमध्ये वाघ्या, बिबट्या कडवा, पानपंखी, सोनपंखी, नीलवंत, निलपुरी, काळा राजा, सरदार, बहुरूपी, अशा विविध प्रजातीच्या फुलपाखरांपैकी आज प्रशालेच्या मैदानावर विविध फुलपाखरू विद्यार्थ्यांना पाहण्यात आले.वाघ्या शुभ्र पंखी, काळूकडवा, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेले निलवंती(ब्लू मार्मन), वाघ्या(क्रीसीपस) त्याचा रंग भगवा असतो, अश्या फुलपाखरू पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आनंद घेतला... यावेळी राष्ट्रीय हरित सेनेचे प्रशालेतील समन्वयक महादेव पुजारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना विविध फुलपाखरू यांचे नावे व माहिती विद्यार्थ्यांना सांगितली...            या पर्यावरणपुरक उपक्रमाचे प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम, पर्यवेक्षक धनवंत करळे,सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले....

साप्ताहिक करकंब दर्शन दिवाळी विशेषांक २०२२ साठी आपले लेख कविता विनोद पाककृती सुविचार पाठवा.

बातमी अणि जाहिराती साठी संपर्क:

9011634250

9764404014


करकंब दर्शन आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त उखाणे स्पर्धा 2022

आपला व्हिडिओ बुधवार दि. 28 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत पाठवावेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा किंवा 9011634250 वर संपर्क साधा.