Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

छत्रपती परिवाराचा (मरवडे)जि. प.प्राथ.वाफळकरवस्ती शाळेला स्वच्छ शाळा सुंदर शाळा जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान

छत्रपती परिवाराचा (मरवडे)जि. प.प्राथ.वाफळकरवस्ती शाळेला स्वच्छ शाळा सुंदर शाळा जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करकंब छत्रपती परिवाराचा व स्व.आप...


छत्रपती परिवाराचा (मरवडे)जि. प.प्राथ.वाफळकरवस्ती शाळेला स्वच्छ शाळा सुंदर शाळा जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान
करकंब छत्रपती परिवाराचा व स्व.आप्पा खंडू भगरे सामाजिक ट्रस्ट वतीने दिला जाणारा स्वच्छ शाळा, सुंदर शाळा जिल्हास्तरीय पुरस्काराचे  वितरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती शाळेला प्रदान करण्यात आला.

सुरूवातीला मा.शिक्षण संचालक महेश पालकर साहेब,दिनकर पाटील साहेब, राज्याध्यक्ष उदयजी शिंदे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, सकाळ संपादक अभय दिवाणजी,प्रदीप मोरे,नितेश खांडेकर, नवनाथ गेंड, अमरसिंह पवार,संजय जावीर, सौ.वनमाला भगरे अध्यक्ष भगरे ट्रस्ट छत्रपती परिवाराचे सर्वेसर्वा सुरेश पवार यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने कार्यक्रमांची सुरुवात झाली, प्रास्ताविक शिक्षक नेते सुरेशजी पवार यांनी केले, त्यामध्ये छत्रपती परिवाराचा २१वर्षाचा प्रवास,व आजची शिक्षकांची अतिरिक्त १५१ कामामुळे शिक्षकांची होणारी होरपळ बोलून दाखवली शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्या सांगितले त्यानंतर प्रमुख मान्यवरांचा सत्कारानंंतर पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न झाला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती शाळेला मान्यवरांच्या शुभहस्ते वितरण करताना या.शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष -नितीन वसेकर माजी अध्यक्ष बिभिषण वसेकर मुख्याध्यापक किरण ढोबळे सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी स्वीकारला,यावेळी शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी मनोगतात सांगितले की शिक्षकांनी स्वाभिमानी भावनेनं जगल पाहिजे शिक्षकाला विद्यार्थी घडवण्याच शिकवण्याच पूर्ण स्वातंत्र्य आहे,ते स्वातंत्र्य इतर कोणत्याही नोकरीमध्ये नाही,मा.किरण लोहार म्हणाले की शिक्षकांनी आपल ज्ञान वाढवले पाहिजे ही ज्ञानाची गंगा मुलांना पर्यंत पोहचवली पाहिजे, शिक्षकांना अनेक कामं आहेत पण सगळीच कामं आमच्या लेवलवर पूर्ण होत नाहीत त्यावेळी आलं आपल्या संघटने मार्फत यांचा पाठपुरावा झाल्यास शक्य आहे, आपल्या शाळेची पटसंख्या कमी होता कामा नये त्यामुळे शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता अडचणी निर्माण करु शकतात, शिक्षकांची जे चांगलं काम आहे ते दाखवण्याचा यापुढील काळात प्रयत्न करणार आहे,संपादक अभयजी दिवाण मनोगतात म्हणाले शिक्षकांना १५१ काम आहेत हे ऐकल्यानंतर शिक्षक मुलांना कसा शिकवू शकेल, गुणवत्ता धारक विद्यार्थी कसा बनेल,पूर्वीचा शिक्षक स्कालरशिप ह्या विषया शिवाय कुठलाच विषयावर चर्चा करत नव्हते तेव्हा विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून शिक्षकांनी आपल काम केले पाहिजे,प्रदीप मोरे यांनी ही आपण आपल्या काळात जि.प.शाळाविषयी काय काय काम केली सांगितले, राज्याध्यक्ष उदयजी शिंदे यांनी शिक्षकांचं विद्यार्थी घडवण्याचं अनमोल कार्य कशाप्रकारे प्रामाणिकपणे करतात सांगत त्या शिक्षकांचे वेगवेगळे प्रश्न पुढे आहेत ते सोडवण्यासाठी समिती कटीबध्द आहे सांगितले नवनाथ गेंड नितेश खांडेकर संजय दुपडे यांनीही मनोगत व्यक्त केली  यावेळी सोलापूर जिल्ह्यातील अनेक शिक्षक शिक्षिका सरपंच,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.शिस्तबध्द नियोजनबद्ध व बौध्दिक विचारमंथन झालेने पुरस्कार वितरण सोहळा अतिशय सुंदररित्या संपन्न झालेल्याभाव प्रत्येक शिक्षक शिक्षिका यांच्या चेहऱ्यावर दिसत होता, आभारप्रदर्शन सुरेश पवार यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती परिवाराचे कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
साप्ताहिक करकंब दर्शन दिवाळी विशेषांक २०२२ साठी आपले लेख कविता विनोद पाककृती सुविचार पाठवा.

बातमी अणि जाहिराती साठी संपर्क:

9011634250

9764404014

करकंब दर्शन आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त उखाणे स्पर्धा 2022

आपला व्हिडिओ बुधवार दि. 28 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत पाठवावेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा किंवा 9011634250 वर संपर्क साधा.

https://youtu.be/u03l1OXnPIs