Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

गायिका मंजुषा पाटील यांच्या सुमधुर स्वरांनी रुक्मिणी मातेची स्वरपूजा ; अभिजात शास्त्रीय गायन व अभंग गायनाने रसिक तल्लीन

गायिका मंजुषा पाटील यांच्या समधूर स्वरांनी रुक्मिणी मातेची स्वरपूजा अभिजात शास्त्रीय गायन व अभंग गायनाने रसिक तल्लीन पंढरपूर:-प्रतिवर्षाप्रम...


गायिका मंजुषा पाटील यांच्या समधूर स्वरांनी रुक्मिणी मातेची स्वरपूजा

अभिजात शास्त्रीय गायन व अभंग गायनाने रसिक तल्लीन


पंढरपूर:-प्रतिवर्षाप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर आयोजित नवरात्र संगीत महोत्सवाची उत्साहात सुरुवात झाली,सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर व सर्व सदस्य आणि कार्यकारी अधिकारी गजानन गुरव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सुरू होत असलेल्या नवरात्र संगीत महोत्सवात स्वरपूजेची पहिली माळ आंतरराष्ट्रीय किर्तीच्या ख्यातनाम गायिका मंजुषाताई पाटील-कुलकर्णी यांनी गुंफले, सुरुवातीला गायिका मंजुषाताई पाटील सदस्या शकुंतला नडगिरे मॅडम यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
त्यामध्ये त्यांनी सुरुवातीला राग श्री ताल झपतालमध्ये सादर करत त्याला जोडून तीनतालातील बंदिश सादर करुन दमदार तितक्याच आलापी,ताना, यांनी रसिकजनांना अभिजात शास्त्रीय संगीत काय शक्ती आहे याची जाणीव करून दिली, त्यानंतर अनेक संतांच्या अभंगरचना त्यामध्ये घेई घेई माझे वाचे,आधी रचिली पंढरी,जय दुर्गे भवानी,झाले समाधान तुमचे देखिले चरण,श्रीरंगा कमला कांता,अवघे गर्जे पंढरपूर,अशा अनेक सुंदर अभंगरचना गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले.शेवटी अगा वैकुंठीच्या राजा भैरवी ने कार्यक्रमांची सांगता केली त्यांना तितकीच दमदार साथसंगत तबला प्रशांत पांडव हार्मोनियम अभिनय रवंदे पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ अक्षय तळेकर स्वरसाथ रसिका वैशंपायन,रसिका पैठणकर,देवश्री दंडवते,शर्या ब्रंह्मी यांनी केली,तर सुत्रसंचलन विक्रम बिस्किटे यांनी केले,पहिल्याच दिवशी रसिक श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला पुढील ४ तारखेपर्यत चालणाऱ्या या संगीत महोत्सवाला रसिकांनी असाच मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने करण्यात आले महोत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती पदाधिकारी अधिकारी कर्मचारी अधिक परिश्रम घेत आहेत.साप्ताहिक करकंब दर्शन दिवाळी विशेषांक २०२२ साठी आपले लेख कविता विनोद पाककृती सुविचार पाठवा.

बातमी अणि जाहिराती साठी संपर्क:

9011634250

9764404014


करकंब दर्शन आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त उखाणे स्पर्धा 2022

आपला व्हिडिओ बुधवार दि. 28 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत पाठवावेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा किंवा 9011634250 वर संपर्क साधा.

https://youtu.be/u03l1OXnPIs