Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब गावच्या लेकीचं झाड एकलव्य अभ्यासिका,व जागर स्वच्छता टीम तिन्ही उपक्रम महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी:- सुहासिनी शहा

करकंब गावच्या लेकीचं झाड  एकलव्य अभ्यासिका,व जागर स्वच्छता टीम तिन्ही उपक्रम महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी:- सुहासिनी शहा वृक्षारोपण करणे काळा...

करकंब गावच्या लेकीचं झाड  एकलव्य अभ्यासिका,व जागर स्वच्छता टीम तिन्ही उपक्रम महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी:- सुहासिनी शहा

वृक्षारोपण करणे काळाची गरज :-रजनीताई देशमुख

करकंब ग्रामपंचायतीच्या वतीनं पाहिजेल ते सहकार्य मिळेल:-सतिश देशमुख

करकंब:-करकंब गावच्या लेकीचं झाड अभियानांतर्गत वृक्षारोपण पंधरवडा यामध्ये ३००भारतीय प्रजाती झाडांचा वृक्षारोपण पूर्ती सोहळा ब्रह्मानंद महाराज मठ करकंब येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी सुहासिनी शहा यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

सुरुवातीला सर्व मान्यवरांचे करकंब गावच्या लेकीचं झाड टीमच्या वतीने स्वागत करण्यात आले त्यानंतर विठूरायाच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर प्रमुख अतिथी सुहासिनी शहा, रजनीताई देशमुख,तेजमालाताई पांढरे, आदिनाथ देशमुख बाळासाहेब देशमुख,राहुल काका पुरवत,रघूनाथ जाधव,सतिश देशमुख,शिवाजी शिंदे,सतिश चव्हाण, शरदचंद्र पांढरे, लक्ष्मण वंजारी,पञकार बांधव,प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधवजी देशपांडे,महंत नारायणदास, समाधान पाटील,संतोष नवगिरे,यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.त्यानंतर सुहासिनी शहा, रजनीताई देशमुख.सतिश देशमुख यांची मनोगते व्यक्त केली.त्यामध्ये सुहासिनी शहा म्हणाल्या करकंब गावच्या लेकीचं झाड व जागर स्वच्छता अभियान आणि एकलव्य अभ्यासिका हे तिन्ही उपक्रम अतिशय स्तुत्य असून अशा उपक्रमांची अतिशय गरज आहे,सर्वांनी झाड लावली पाहिजेत,त्यांचं संवर्धन केलं पाहिजे,त्याचबरोबर प्लास्टिक चार वापर बंद केला पाहिजे, माझे चितळे परिवाराच आणि करकंबचे फार वर्षांपूर्वीच नातं जोडले गेलेले आहे त्या ओढीनं मला करकंब मध्ये येता आले, सर्व उपक्रमांना शुभेच्छा दिल्या‌. त्यानंतर वृक्षारोपण करणे काळाची गरज असून सर्वांनी वृक्षारोपण करावे असे रजनीताई देशमुख यांनी सांगितले आणि प्रा.सतिश देशमुख यांनी या उपक्रमामुळे  करकंब ग्रामपंचायतीचे नाव होतेय यांचा आम्हांला अभिमान वाटतो यापुढील काळात लागेल ते सहकार्य करु असे सांगितले....या कार्यक्रमाला करकंब मधील सर्व वृक्ष प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे  प्रास्ताविक नंदलाल कपडेकर यांनी केले सुत्रसंचलन व संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले तर आभार पांडुरंग काटवटे यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करकंब गावच्या लेकीचं झाड टीमचे  जागर स्वच्छता अभियान टीम व एकलव्य अभ्यासिका टीमचे हरिश्चंद्र वास्ते,गणेश पिसे,प्रमोद रेडे अक्षय नगरकर, आत्माराम चवरे,विजय जाधव,धोंडीराम भाजीभाकरे, हेमंत टकले,नागेश खारे,रमेश खारे, देविदास काटवटे,विशाल खारे,लाला पवार,अक्रुर शिंदे,चेतन पुरवत,राजू अनवते, अंजली टकले, वृषाली बोधे,गायत्री कुलकर्णी,सविता दुधाणे,अम्रुता रसाळ,काजल बनकर, प्राजक्ता लोकरे, अनुपमा दुधाणे,धनश्री काटवटे,साधना टकले,आशा टकले,रंजना टकले,देवकी दुधाणे,अंजली रेडे,सह्याद्री औद्योगिक प्रशिक्षण संस्था करकंबचे ५०विद्यार्थी यांचे अनमोल सहकार्य लाभले.