Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

आपटे उपलप प्रशाला इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

पंढरपूर: शतकोत्तर आपटे उपलप प्रशाला पंढरपूर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेचे माजी मुख्...पंढरपूर:

शतकोत्तर आपटे उपलप प्रशाला पंढरपूर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला.


प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेचे माजी मुख्याध्यापक व विद्या विकास मंडळाचे सदस्य हरिभाऊ डांगे उपस्थित होते तर प्रशालेचे मुख्याध्यापक जयंत हरिदास अध्यक्षस्थानी होते. 


मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी केले. यावेळी प्रशाला व शिक्षकांबद्दल ऋण व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन शिक्षकांचा सन्मान केला.


प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक अनिल अभंगराव, सौ. रुपाली कुलकर्णी, अनिल जाधव, सागर थिटे, राहुल भातलवंडे आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.


माजी मुख्याध्यापक हरिभाऊ डांगे यांनी गणित विषयाबद्दल विशेष मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या तर मुख्याध्यापक जयंत हरिदास यांनी विद्यार्थ्यांनी आपले करियर कडे लक्ष देऊन प्रशालेचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन करीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाचं प्रस्ताविक अक्षदा वाघमारे आभार गायत्री जुमाळे, सूत्रसंचालन सुफीया तांबोळी हिने केले तर समृद्धी परचंडे आदि  विद्यार्थ्यांनींनी विशेष परिश्रम घेतले.