Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जि प प्राथ.शाळा मुले क्र 2 करकंब शाळेची वार्षिक तपासणी संपन्न

      आज दिनांक 5/3/2022 रोजी जि प प्रा शाळा मुले क्र 2 करकंब शाळेची वार्षिक तपासणी करकंब केंद्राचे आदर्श केंद्रप्रमुख मा श्री आप्पासाहेब मा...

      आज दिनांक 5/3/2022 रोजी जि प प्रा शाळा मुले क्र 2 करकंब शाळेची वार्षिक तपासणी करकंब केंद्राचे आदर्श केंद्रप्रमुख मा श्री आप्पासाहेब माळी साहेब यांनी केली.

  तपासणी करताना प्रत्येक वर्गाची गुणवत्ता पडताळणी करण्यात आली.कोरोना काळातही उत्तम गुणवत्ता जपल्याचे साहेबांनी सांगितले.

 इयत्ता पहिलीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी मराठी आणि इंग्रजी कविता सुरेल, लयबद्ध व कृतीयुक्त पद्धतीने गायन केले.तसेच पहिलीच्या मुलांनी कार्यानुभव अंतर्गत प्रकल्पात अनेक सुंदर आणि सुबक अशा वस्तू बनवल्या आहेत त्याबद्दल मुलांचे कौतुक साहेबांनी केले.

 इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना मराठीचे समजपूर्वक वाचन करण्यास लावले असता प्रत्येक मुलांनी समजपूर्वक आणि स्पष्ट वाचन केले.तसेच 2अंकी संख्येचे वाचन करण्यास आणि लिहिण्यास सांगितले असता मुलांनी अचूक वाचन आणि लेखन केले. काही मुलांनी इंग्रजी वाक्य वाचून दाखवले.त्याबद्दल मुलांचे कौतुक करून अमूल्य असे मार्गदर्शन केले.

           इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयातील मापन या आधारित प्रश्न विचारण्यात आले असता प्रत्येक विद्यार्थ्यांनी अचूक उत्तरे दिली.तसेच इंग्रजी विषयातील ON,IN, UNDER, NEAR या words चा वापर करून वाक्य निर्मिती आणि त्यावर आधारित संभाषण करण्यास सांगितले असता मुलांनी योग्य प्रकारे वाक्य निर्मिती आणि संभाषण केले.त्याबद्दल साहेबांनी मुलांचे कौतुक करून योग्य असे मार्गदर्शन केले.

       इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना परिच्छेद वाचन करण्यास सांगितले असता मुलांनी अचूक आणि स्पष्ट वाचन केले. दिशा बाबत प्रश्नांची उत्तरे अचूक आणि योग्य दिली. तसेच गणित विषयातील अपूर्णांक या घटकावर प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांनी घटकावरील सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक दिली. त्याबद्दल साहेबांनी विद्यार्थ्यांचे शाबासकी देऊन कौतुक केले.

             एकंदरीत विद्यार्थ्यांची एकूण गुणवत्ता उत्तम असल्याचे सांगून माळी साहेबांनी शिक्षक वर्गांचे अभिनंदन केले.

    सर्व शालेय दप्तर, अभिलेखे, शिक्षक आणि विद्यार्थी रेकॉर्ड तपासणी केले असता सर्व रेकॉर्ड्स अद्यावत असल्याचे आढळून आले.तसेच शालेय इमारती व शाळेच्या आवारात स्वच्छता आढळून आली.त्याबद्दल साहेबांनी मुख्याध्यापिका श्रीमती अनिता गोविंद वेळापूरकर, शाळेतील शिक्षिका सौ चंद्रकला दत्तात्रय खंदारे, शाळेतील शिक्षक श्री रविकिरण भास्कर वेळापूरकर आणि शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक श्री बालाजी माणिकराव मुदगडे यांचे अभिनंदन केले.

     शालेय परिसरात वृक्षारोपण करून त्यांची जोपासना ही चांगल्याप्रकारे केल्याने शाळेचे वातावरण प्रसन्नदायक असल्याचे माळी साहेबांनी विशेष कौतुक केले.