Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जि.प. प्राथमिक शाळा गायकवाडवाडी(अरण) शाळेचा जिल्हा परिषद सोलापूर येथे गुणगौरव

जिल्हा परिषद सोलापूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा दिलीप स्वामी साहेब यांनी राबविलेल्या "स्वच्छ शाळा सुंदर शाळा" या उपक्रमाचे जिल्...

जिल्हा परिषद सोलापूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा दिलीप स्वामी साहेब यांनी राबविलेल्या "स्वच्छ शाळा सुंदर शाळा" या उपक्रमाचे जिल्हा स्तर पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ०८/०२/२०२२ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह जि. प. सोलापूर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री.अजितदादा पवार ,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा श्री. दत्तात्रय भरणे,मा. श्री.अनिरुद्ध कांबळे, अध्यक्ष जि.प. सोलापूर, मा. श्रीमती वंदना कृष्णा,अपर मुख्य सचिव शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन,मा श्री. राजेश कुमार,  अपर मुख्य सचिव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन,मा. श्री.सौरभ राव विभागीय आयुक्त पुणे, मा.श्री.विशाल सोळंकी आयुक्त शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन,मा श्री.दिनकर टेमकर संचालक राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालय, जिल्हाधिकारी मा. श्री.मिलिंद शंभरकर पोलीस अधीक्षक मा.तेजस्विनी सातपुते मा.श्री.दिलीप स्वामी मुख्य कार्यकारी अधिकारी जि प सोलापूर, मा. श्री. किरण लोहार, शिक्षणाधिकारी जि. प. सोलापूर, मा. श्री. दिलीप चव्हाण, सभापती शिक्षण व आरोग्य समिती जि प सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.

जि.प. प्राथमिक शाळा गायकवाडवाडी (अरण) ता. माढा जि. सोलापूर या शाळेने स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमात माढा तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल जिल्हास्तरावर वरील मान्यवरांच्या उपस्थितीत आणि हस्ते गुणगौरव करण्यात आला आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

 सदर पुरस्कार वितरित करताना मा श्री भारत आबा शिंदे जि. प. सदस्य गट मोडनिंब, अरण केंद्राचे आदर्श केंद्रप्रमुख आणि आमचे मार्गदर्शक मा. डॉ.श्री. विलासजी काळे साहेब,मा. श्री. बालाजी मुदगडे सर शाळा व्यवस्थापन समिती गायकवाडवाडी आदर्श माजी अध्यक्ष मा.श्री. शरदजी सावंत, शाळा व्यवस्थापन समिती गायकवाडवाडी सध्याचे आदर्श अध्यक्ष मा. श्री.नवनाथजी सावंत,शाळेचे आदर्श शिक्षक आणि तंत्रस्नेही शिक्षक मा. श्री. अभिजित चवरे* आणि शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका मा. श्रीमती. सुनिता उमाकांत राडकर यांचा वरील मान्यवरांनी सत्कार केला.