Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब जि. प. गटातील विकास कामासाठी सहा कोटी मंजुर- रजनीताई देशमुख

करकंब प्रतिनिधी सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करकंब जि. प. गटातील विविध विकास कामांसाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आ...


करकंब प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करकंब जि. प. गटातील विविध विकास कामांसाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती तथा जि. प. सदस्या रजनी ताई देशमुख यांनी दिली.


स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आमदार प्रशांतराव परिचारक, आ. बबनदादा शिंदे, मा. जि. प. सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना पंढरपूर तालुक्यासह करकंब जि. प. गटासाठी ही मोठ्या प्रमाणावर निधी रजनी ताई देशमुख यांनी खेचून आणला आहे.


करकंब गटातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नूतनीकरण व दुरुस्ती साठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नांदोरे, सांगवी, उंबरे, बार्डी, करकंब, करोळे या आरोग्य वर्धिनी केंद्रांसाठी ३२लाख  रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे, तर करकंब येथील उजनी वसाहत व पांढरे वस्ती येथील अंगणवाडी बांधकामासाठी १७लाख रुपये व जाधववाडी, नांदोरे,उंबरे, बार्डी, भंडारे वस्ती,  घाटूळे वस्ती ,  उर्दू करकंब जि प प्राथमिक शाळा दुरुस्ती साठी १८लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.



जनसुविधा पुरवणे अंतर्गत करकंब येथील धायगुडे वस्ती रस्ता व काटवटे वस्ती रस्ता २०लाख, करोळे येथील यल्लमा देवी वाहनतळ व बेलदर वस्ती रस्ता ११लाख, जळोली येथील रस्ता २०लाख, बादलकोट येथील कनकाई देवस्थान रस्ता ३लाख, उंबरे येथील मूजमुले वस्ती रस्ता ३लाख, नांदोरे गावातील रस्त्यांसाठी व हायमास्ट साठी ५लाख, कान्हापुरी स्मशानभूमी रस्ता ७लाख, बार्डी येथील रस्ता १०लाख, जाधववाडी स्मशानभूमी रस्ता ७लाख, खरातवाडी शिव रस्ता १०लाख, असे एकूण ९६लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, १५वा वित्त आयोग अंतर्गत करकंब, करोळे, जळोली, बादलकोट, नांदोरे आदी गावातील  विकास कामासाठी २५लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.



करकंब घोटी रस्ता २०लाख,

करकंब पेहे रस्ता १५ लाख, करकंब मेंढापुर रस्ता १० लाख, करकंब वाफळकर   वस्ती १३लाख, नांदोरे -पेहे-. शेवते रस्ता ४० लाख,  तसेच करोळे ते बंधारा रस्ता कॉक्रीटीकरण साठी१५लाख रुपये असे एकूण रस्त्याच्या कामासाठी एक कोटी १३लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.नागरी सुविधा योजनेतून करकंब येथील नंदू माळी दत्तात्रय काळे ते नेमतवाडी रोड व राम मंदिर ते बरीदे घर रस्त्यासाठी १०लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.



जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून बार्डी ४२.२८लाख, बादलकोट ४२.६७लाख, जाधववाडी २१.६१लाख, कान्हापुरी १कोटी ९.६५लाख , असे एकूण २कोटी१६लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर हरिजन वस्ती सुधारणा करण्यासाठी करकंब चर्मकार वस्ती व खंदारे वस्ती १८लाख, उंबरे ५ लाख, सांगवी ३ लाख, करोळे ७ लाख, कान्हापुरी ३लाख, असे एकूण ३६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतून सांगवी व करोळे गावातील मंदिर परिसर विकास करण्यासाठी ६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.