Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंबच्या दोन नंबर सोन्याचे आमिष दाखवुन दरोडा टाकणारे आरोपी जेरबंद

मा.पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम व अपर पोलीस अधिक्षक श्री. हिंमत जाधव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपुर विभाग श्री. विक्रम ...

मा.पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम व अपर पोलीस अधिक्षक श्री. हिंमत जाधव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपुर विभाग श्री. विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस ठाणेची हददीमधुन पाहीजे आरोपींचा शोध मोहीम घेणेबाबत आदेश देण्यात आलेले होते.

       करकंब पोलीस ठाणे कडील करकंब पोलीस ठाणेस गु.र.नं.१३/२०२२ भादविसं ३९५ वैगेरे प्रमाणे दोन नंबरचे सोने देतो म्हणुन करकंब ते टेंभुर्णी रस्त्यावर हायटेंशन तारेजवळ पडीक रानामध्ये पंढरपुरच्या युवकांना बोलावुन खरे सोने आहे म्हणुन दाखवुन खोटे सोने देवुन त्यांचेकडील रोख रक्कम हिसकावुन घेवुन चाकु,कोयते गळयाला लावुन दरोडयाचा गुन्हा दिनांक १३/०१/२०२२ रोजी करकंब पोलीस ठाणेस दाखल करण्यात आला होता.सदरच्या गुन्हयाची गंभीरता लक्ष्यात घेवुन सपोनि निलेश तारु यांनी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे सुचनेनुसार व फिर्यादी व साक्षिदार युवकांनी दिलेल्या माहीतीवरुन तत्काळ रातोरात पथके तयार करुन कशोसीने शोध मोहीम घेवुन सदरच्या गुन्हयातील सराईत गुन्हेगार असलेले ३ मोहोळ तालुक्यातील आरोपी, १ सांगली जिल्हयातील,२ स्थानिक करकंब व बादलकोट येथील आरोपी अटक करण्यात आलेले होते.सदरच्या आरोपींनी कोर्टामध्ये पोलीसांविरुध्द तक्रार करीत पोलीस कोठडी मिळु दिलेली नव्हती परंतु करकंब पोलीसांनी सरकारी वकील यांचे मार्फतिने वरीष्ठ न्यायालयामध्ये दाद मागत सर्व आरोपींची पुन्हा पोलीस कोठडी मिळवुन घेतली व पुन्हा त्यांचेकडे तपास केला असता गुन्ह्यातील काही मुददेमाल व वाहने, मोबाईल व रोख रक्कम व हत्यारे जप्त करण्यात करकंब पोलीसांना यश आलेले आहे.सदरच्या गुन्हयातील सध्या २ आरोपी यांची पोलीस कोठडी असुन त्याचा तपास सपोनि निलेश तारु हे करीत आहेत. सदरची कारवाई उपविभागीय पो.अधि. विक्रम कदम यांचे मार्गदर्शनखाली करकंब पोलीस ठाणेचे प्रभारी मा.सहा.पोलीस निरीक्षक निलेश तारु यांचेसह पोउपनि महेश मुंढे, पोउपनि अजित मोरे, पोहवा रानगट, पोहवा गोडसे, पोहवा जाधव, पोहवा गोरेवे, पोहवा घोळवे, पोना कोळवले, पोना सावंत, पोना हजारे, पोना कांबळे, पोना सलगर, पोना गावडे, पोना गायकवाड, पोना लेंगरे, मपोना पवार, पोकॉ दुधे, मपोकॉ माने यांनी केलेली आहे.