Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

सा. करकंब दर्शन दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न

प्रतिनिधी। करकंब  साप्ताहिक करकंब दर्शन दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी मनमोकळ्या वातावरणात करण्यात आले.   य...

प्रतिनिधी। करकंब 

साप्ताहिक करकंब दर्शन दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी मनमोकळ्या वातावरणात करण्यात आले.

  यावेळी करकंबच्या प्रथम नागरीक अर्थात सरपंच तेजमाला शरदचंद्र पांढरे, माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी रघुनाथजी जाधव, प्रा. सतिश देशमुख,  स्टेट बॅकेचे शाखाधिकारी विजय भागवत, रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. प्रशांतकुमार मोरे, सदभावना सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश शाह, पंढरपूर येथील प्रसादराव एन्टरप्राईजेसचे बंडू ताड, ॲड. शरदचंद्र पांढरे,माजी उपसरपंच बाळासाहेब शिंगटे,  प्रा. बबन जगताप, प्रा. प्रमोद रेडे-पाटील, सामाजिक कार्यकर्ते अजितसिंह देशमुख, देशमाने,  ग्रा. पं. सदस्या सौ. कल्पना देशमुख, वैशाली देशमुख, छाया मोरे, संध्या भागवत, सौ. शहा, गॅलॅक्सी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या संचालिका सरिता थिटे, करकंब दर्शनचे संपादक सागर थिटे, लक्ष्मण जाधव, अनुष्का थिटे, सारांश थिटे, दीपाली गुळमे, सौ. मयुरा पवार आदी उपस्थित होते. 

  यावेळी प्रा. सतिश देशमुख म्हणाले, सा. करकंब दर्शन विविध उपक्रम, स्पर्धा राबवून आपली सामाजिक बांधिलकी जपत आहे. दिवाळी अंक, दिनदर्शिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर मांडणी करुन वाचकांना वैचारिक भेट दिली जात आहे. नवीन लेखकांना यातून प्रोत्साहन मिळत आहे.' यावेळी त्यांनी काही कविताही सादर केल्या.

यावेळी महिला भगिनींना विशेष संक्रांत भेट देण्यात आली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर थिटे यांनी तर आभार एल. एम.  जाधव यांनी मानले.

सदरचा कार्यक्रम यूट्यूब लाईव्ह करण्यात आला



.