Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

संत परंपरेचा वारसा असलेल्या हरिदास परिवाराने आपलेपणा जपलेला आहे.- न्यायमूर्ती जी. एम. चरणकर

३७ वर्षाच्या सेवेनंतर स.पो.फौ. सुनिल हरिदास पोलीस सेवेतून निवृत्त मंगळवेढा - संत परंपरेचा प्रदिर्घ वारसा असलेल्या हरिदास परिवाराने आपलेपणा आ...

३७ वर्षाच्या सेवेनंतर स.पो.फौ. सुनिल हरिदास पोलीस सेवेतून निवृत्त

मंगळवेढा - संत परंपरेचा प्रदिर्घ वारसा असलेल्या हरिदास परिवाराने आपलेपणा आजही जपलेला आहे अशा भावना मंगळवेढ्याचे दिवाणी व फौजदारी न्यायाधीश जी. एम. चरणकर यांनी व्यक्त केल्या.ते मंगळवेढा येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहा. पोलीस फौजदार सुनिल हरिदास हे ३७ वर्षाच्या सेवेनंतर सेवनिवृत झाले.त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित केलेल्या सेवागौरव समारंभात बोलत होते. न्यायाधीश  जी एम चरणकर यांचे हस्ते सपत्निक सेवागौरव करण्यात आला.आशिर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर ह.भ.प.मदनमहाराज हरिदास,मंगळवेढा विभागाच्या पोलिस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील सहा.पोलीस निरीक्षक बी. बी.पिंगळे उपस्थित होते. 

समारंभाची सुरुवात सौ. मंदा हरिदास यांच्या अभंग गायनाने झाली. स्वागत व प्रास्ताविक बाळकृष्ण हरिदास(वापी), यांनी केले. अ.भा.ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक शशिकांत हरिदास, रमेश जोशी,अरुण गर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील इ.नी मनोगत व्यक्त करतांना त्यांचा विशेष गौरव केला. 

या सेवागौरव समारंभासाठी सहा.पोलीस निरीक्षक सत्यजीत आवटे,अमोल बामणे, भगवान बुरसे, पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे, सौ.संगीता गुंजवटे,मंगळवेढा वकील संघाचे अध्यक्ष भालचंद्र पटवर्धन,सहा.अभियोक्ता धनंजय बनसोडे, डी एम.शेख,मंत्रालय कक्ष अधिकारी विक्रमसिंह शिंदे, अ.भा. ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष विनोद भरते, प्रांत शिक्षण विषय प्रमुख दीपक इरकल,जेष्ठ विधिज्ञ रमेश जोशी, भागवत कथाकार रघुराजशास्त्री पारेकर, आपटे उपलप प्रशालेचे मुख्याध्यापक जयंत हरिदास,जिल्हा मध्य.बँकेचे सिनियर इन्स्पेक्टर मिलिंद देशपांडे,कुमार हरिदास, प्रदिप हरिदास, पुणे,मकरंद हरिदास, एस. आर. देशपांडे सर नातेपुते,मिलिंद हरिदास,डॉ. मुकुंद महाजन डॉ. रंगनाथ हरिदास ,मुकुंद देशपांडे,आनंद पाटील, दिलिप केसकर, बंडोपंत गुलाखे,तसेच नंदकुमार हरिदास, अरुणकाका कुलकर्णी, सांगोला, नातेपुते, करमाळा, पंढरपूर येथील विविध क्षेत्रातील संस्था, संघटनेचे पदाधिकारी,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुत्रसंचालन दीपक इरकल यांनी केले तर आभार जयंत हरिदास यांनी मानले.