Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

बाभुळगावच्या तीन मल्लांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड

पंढरपूर - तालुक्यातील बाभुळगाव येथील तीन मल्लांची पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातून निवड झाली.  पुण...पंढरपूर - तालुक्यातील बाभुळगाव येथील तीन मल्लांची पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातून निवड झाली. 

पुणे बालेवाडी येथे 24 व  25 नोव्हेंबर रोजी विविध वजनी गटात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे. सोलापूर जिल्ह्याची निवड चाचणी नुकतीच सोलापूर येथे पार पडली. या चाचणीत बाभुळगाव येथील तिघांची निवड झाली आहे. शुभम धर्मराज चव्हाण याने 97 किलो वजनी गटात कुर्डुवाडीच्या राहुल सूळ वरती गुणाधिक्याने प्रथम क्रमांक मिळवला. गणेश ब्रह्मदेव चव्हाण याने 92 किलो वजनी गटात पेनूरच्या महेश काळे ला चितपट करत (गादी विभाग ) प्रथम क्रमांक पटकावला. तर 70 किलो गादी विभागामध्ये रविराज चव्हाण याने शेवते च्या बबलू सुतारला 10-0 अशा गुण फरकाने प्रथम क्रमांक मिळवला. या तिघांची बालेवाडी येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिन्ही मल्लांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.