Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

उंबरे पागे येथे रणजितभैय्या शिंदे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

 उंबरे (पागे) 1 नोव्हेंबर 2021 : माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.बबनदादा शिंदे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या २५१५ मधील वावरे वस्ती डांब...


 उंबरे (पागे) 1 नोव्हेंबर 2021 :

माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.बबनदादा शिंदे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या २५१५ मधील वावरे वस्ती डांबरीकरण (१०लाख) आणि आमदार निधीतून खंडोबा मंदिर सभामंडप (७लाख) या कामांचे भूमिपूजन माढा विधानसभा मतदार संघाचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य मा. रणजितभैय्या शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच करकंब चे उपसरपंच आदिनाथ देशमुख, जळोली सरपंच ज्योतीराम मदने,बार्डी चे अभिजीत कवडे, पोपटमामा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

 यावेळी मा.सरपंच ज्ञानदेव कोरके, भारत वावरे, ज्ञानदेव ढोबळे, चांगदेव कदम, परमेश्वर लोंढे, पांढरे भाऊसाहेब ,हरीनाना कानगुडे, सरपंच कांताबाई शिंदे, उपसरपंच नागनाथ कानगुडे, राष्ट्रवादी यु.काँ. जिल्हा उपाध्यक्ष शहाजी मुळे, स्वाभिमानी तालुका अध्यक्ष अमर इंगळे, कॉन्ट्रॅक्टर संतोष लांबगुडे, विठ्ठल माळी, विलास सलगर, ब्रह्मदेव कानगुडे, विजय मुजमुले, सागर हुबाले, अंबादास कदम,दिपक ढोबळे, अशोक पाटील,लक्ष्मण हुबाले, विजय गुजर,बापु कानगुडे तसेच उंबरे ग्रामस्थ उपस्थित होते.


Advertisement