Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

शिवकालीन किल्ला बांधणी स्पर्धा निकाल जाहीर 💥🏮🎊🎊🎊🎊🎊🏮💥

वसुंधरा पर्यावरण मंडळ(RJHSK)करकंब आम्ही किल्लेदार..... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 करकंब:-        रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब येथील राष्ट्रीय हरीत स...


वसुंधरा पर्यावरण मंडळ(RJHSK)करकंब

आम्ही किल्लेदार.....

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


करकंब:-

       रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब येथील राष्ट्रीय हरीत सेनेच्या "वसुंधरा पर्यावरण मंडळ" करकंब च्या वतीने आयोजित ईको फ्रेंडली (पर्यावरण पुरक)गड किल्ले बाधणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

       सर्वात मोठा असणारा दिवाळीचा सण कोरोनाच्या पाश्वभूमीवर घरी बसूनच साजरा करताना इ.5वी ते10वी विद्यार्थ्यांचा उत्साह कमी होवू नये म्हणून ईको फ्रेंडली (पर्यावरण पुरक)किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या मागे दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्याबरोबरच रयतचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गड किल्यांच्या बळावर बलाढ्य शत्रूला नामोहरम केले त्या गड किल्ल्यांची ओळख भावीपिढीला व्हावी,आपल्या शुरवीरांच्या पराक्रमांची महती ज्ञात व्हावी हा देखील उद्देश या गड किल्ले बांधणी स्पर्धेचा आहे.

    या गड किल्ले बांधणी स्पर्धेत भरपूर स्पर्धकांनी सहभाग घेतला असून सर्व सहभागी स्पर्धकांनी पाठवलेल्या किल्ल्यांच्या फोटोचे निरीक्षण करून तज्ञ परीक्षक आदरणीय

श्री.दत्तात्रय खंदारे सर (उपक्रमशील मुख्याध्यापक जि.प.प्राथ मुली क्र.2करकंब),


श्री.सागर थिटे सर (आदर्श कलाशिक्षक, आपटे उपलप प्रशाला पंढरपूर),

श्री.नंदकुमार कुंभार सर (आदर्श कलाशिक्षक, कन्या प्रशाला टेभूर्णी) यांनी उत्कृष्ट परीक्षण करून विजेते स्पर्धक ठरविले.

1) देवराज दत्तात्रय पवार 8वी प्रथम क्रमांक

2) विशाल रमेश वसेकर 9वी द्वितीय क्रमांक 

3) रोहन अशोक कुंभार  9वी तृतीय क्रमांक

4) समर्थ अभिजित टेके 6वी उत्तेजनार्थ

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना लवकरच विविध मान्यवरांच्या व परीक्षकांच्या उपस्थितीत  आकर्षक बक्षिसे दिली जातील .सहभागी सर्व स्पर्धकांचे व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन

समन्वयक/सचिव : श्री. एम.के. पुजारी सर 

अध्यक्ष :  श्री. हेमंत कदम सर

💐💥💥🎊🎊🎊💥💥💐