Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  उजनी धरणात शनिवार दि. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ८ वा. उपयुक्त पाणीसाठा १०८.३१% इतका झाला असल्याने तसेच धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल...

 


उजनी धरणात शनिवार दि. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ८ वा. उपयुक्त पाणीसाठा १०८.३१% इतका झाला असल्याने तसेच धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने दौंड येथील विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. 

त्या अनुषंगाने उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने पूर नियंत्रणासाठी उजनी धरण सांडव्यातून भीमा नदी पात्रात रात्री ९ वाजल्यापासून ५००० क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. सदरचा विसर्ग कमी - जास्त केला जाणार असल्याने भीमा नदीच्या काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.