Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

आरपीआय व भिमराव दादा शिंदे सोशल फाउंडेशनच्या वतीने करकंब येथे सिध्दार्थ नगर मध्ये मोफत लसीकरण शिबिर संपन्न

राज्यमंत्री राजाभाऊ सरवदेसो यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A), तसेच भिमराव दादा शिंदे सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्...


राज्यमंत्री राजाभाऊ सरवदेसो यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A), तसेच भिमराव दादा शिंदे सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक:- 22/10/2021 रोजी सिद्धार्थ नगर करकंब येथे कोविड लसीकरण व लसीकरण जनजागृती करण्यात आले. या वेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून सुरवात करण्यात आली. त्याचप्रमाणे नागरिकांनी शिबिराचा लाभ घेत 109 लसीकरणाचा आकडा पार केला .यावेळी आयोजक रिपाइंचे सुरेश शिंदे जिल्हा उपाध्यक्ष, वंशदिप भिमराव दादा शिंदे तालुका उपाध्यक्ष, भागवत लोंढे तालुका सरचिटणीस, आकाश शिंदे संघटक, बापू शिंदे ग्रा सदस्य, हनुमंत शिंदे सरचिटणीस, किरण शिंदे, दत्ता शिंदे हे उपस्थित होते.


तसेच आरोग्य विभागाचे श्री. लादे, श्रीमती खरात मॅडम, स्वाती टेके, मनीषा टेके यांचे सहकार्य लाभले.

Advertise