Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2019 ची लेखी परीक्षा 1 ऑक्टोबर 2021 ला

सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या 41 चालक पोलिस शिपाई पदाच्या भरती करता सन 2019 मध्ये जाहिरात देण्यात आली होती. सदर ...


सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या 41 चालक पोलिस शिपाई पदाच्या भरती करता सन 2019 मध्ये जाहिरात देण्यात आली होती. सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा दिनांक 1 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 वा. घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेकरता दिनांक 1 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 8.00 वाजता हजर राहावे. 9.30 वा. नंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश दिला जाणार नाही. सदर परीक्षेकरता उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र (HALL TICKET) दि. 27 सप्टेंबर 2021 रोजी पासून  
http://mahapolicerc.
mahaitexam.in/phaseone 
या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर लेखी परीक्षेकरिता प्रवेशपत्र, सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म व उमेदवारांकरिता सूचना अशी चार पाने सोबत जाताना न्यावीत.

पोलीस भरती लेखी परीक्षेस जाताना सोबत काय न्यावे.

1.प्रवेश पत्र (हॉल तिकीट) पूर्ण चार पानांसहित 
2.काळा/निळा बॉलपेन 
3.अलीकडच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो.
4. वैध ओळखपत्र (आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान ओळखपत्र/ ड्रायव्हिंग लायसन्स /पासपोर्ट).

काय सोबत नेऊ नये.

1.मोबाईल फोन 
2.स्मार्ट वॉच /घड्याळ
3.इलेक्ट्रिक उपकरणे
4.कॅल्क्युलेटर
5. ब्लूटूथ
वरीलपैकी साहित्य सोबत आणले असता जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल इ. सूचना जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रामीण यांनी दिल्या आहेत.