Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

शिवजयंती निमित्ताने करकंब येथे नादब्रह्म कला फाउंडेशनच्या वतीने शाळास्तरीय भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

  शिवजयंती निमित्ताने करकंब येथे नादब्रह्म कला फाउंडेशन वतीने  शाळास्तरीय भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन जागर स्वच्छता अभियान टीम लेकीचं झाड ...

 


शिवजयंती निमित्ताने करकंब येथे नादब्रह्म कला फाउंडेशन वतीने  शाळास्तरीय भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन


जागर स्वच्छता अभियान टीम लेकीचं झाड टीम व करकंब ग्रामस्थांच्या सहकार्याने तीन दिवस होणार स्वच्छतेचा जागर


शिवजयंती दिवशी पहाटे सर्वांनी आपापल्या घरासमोर सडा रांगोळी काढून पणत्या लावण्याचे टीमच्या वतीने अवाहन 

करकंब: जागर स्वच्छता अभियान टीमच्या वतीने गेल्यावर्षी प्रमाणे याहीवर्षी शिवजयंती,संत गाडगेबाबा जयंती,आणि महाशिवरात्री या त्रिवेणी संगमाच्या निमित्ताने करकंब  स्वच्छता महाअभियान राबविण्यात येणार असून या स्वच्छता मोहिमेमध्ये स्वच्छता जनजागृती आणि अस्वच्छ भागाची स्वच्छता करण्यात येणार असून सर्व स्वच्छतादुतांनी व स्वच्छता प्रेमी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने दिनांक १७-१८-१९ या तिन्ही दिवशी सकाळी ६:००ते ९:०० या वेळेत सहभागी होऊन आपलं गाव आपली जबाबदारी या भावनेतून उपस्थित रहावे,तसेच या निमित्ताने नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब यांचे वतीने शिवजयंती दिवशी दुपारी ११:००वा.श्री चौंडेश्वरी मंदिर करकंब येथे करकंब व करकंब पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी शालेयस्तरीय १ली ते ४थी लहान गट आणि ५वी ते १०वी मोठ्या गटात भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 यासाठी लहान गटांमध्ये 

१)माझे आईबाबा,

२)मोबाईलचा अति वापर ठरतोय धोकादायक

 ३)संत गाडगेबाबा 

४)राजा बालशिवबा 

५) मी झाड बोलतोय 

या विषयांवर होईल आणि 

मोठ्या गटांसाठी 

१) भ्रष्टाचार लागलेली कीड, 

२)जाणता राजा शिवछत्रपती,

३)वाढती व्यसनाधीनता करीत आहे युवकांचे भवितव्य अंधारमय,

४) झाडे लावुया, झाडे जगवूया, 

५) गावच्या स्वच्छतेबरोबर करुया मनाचीही स्वच्छता 

६) शेतकरी राजाला कोण समजून घेईल का?

७) मी नदी बोलतेय 

या विषयावर असून या विषयासाठी ५ मिनिटाचा वेळ दोन्ही गटांसाठी असेल,परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

यासाठी लहान गटांसाठी १००१/-७०१/-५०१/- व‌ प्रमाणपत्र असे बक्षीस असून, 

मोठ्या गटांसाठी २१००/-१५००/-१०००/- प्रमाणपत्र असे अनुक्रमे बक्षीस असेल.

लगेच निकाल लागला की मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण करण्यात येईल.

तरी आपण आपल्या पाल्याची नावनोंदणी नादब्रह्म कला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे 9767776858

प्रमोद रेडे 9561251505

अविनाश देवकते 9421370384

पुजारी सर 9604199001

संजय सांगोलकर 9049639487

प्राथमिक विभाग केंद्रप्रमुख आप्पासाहेब माळी 9421442088

देवकी दुधाणे 8805038204 

या नंबरवर संपर्क करून 18फेब्रवारी पर्यंत नावनोंदणी करावी ऐनवेळी नावनोंदणी करता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जागर स्वच्छता अभियान टीम, करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम, एकलव्य अभ्यासिका टीम अधिक परिश्रम घेत आहेत.