Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

ऑपरेशन परिवर्तन मोहिमे अंतर्गत करकंब पोलीसांच्या पुढाकरातून गावठी दारु निर्मिती करणाऱ्याने सुरू केला हाॅटेल व्यवसाय

करकंबः सोलापुर ग्रामीण पोलीस दल यांचेवतीने पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधिक्षक श्री.हिंमतराव जाधव , उपविभागीय पोलीस अधिक...करकंबः सोलापुर ग्रामीण पोलीस दल यांचेवतीने पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधिक्षक श्री.हिंमतराव जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत करकंब व परिसरातील अवैध हातभट्टी दारु निर्मिती करणारे व विक्री करणारे यांचे समुपदेशन करुन त्यांचे मध्ये मन परिवर्तन करुन अवैध हातभट्टी दारु निर्मिती करणारे हात आता हाॅटेल  व्यवसाय तसेच छोटे-मोठे व्यवसाय करु लागले आहेत. यापुर्वीही करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.निलेश तारु यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री. महेश मुंढे, व पोलीस उपनिरीक्षक श्री.अजित मोरे यांचे माध्यमातून पाठपुरावा करुन किराणा व्यवसाय, शेळी पालन, दुग्ध व्यवसाय व महिला बचत गटाचे माध्यमातून कुटुंबाचे उपजिवीकेसाठी पुरक असे व्यवसाय तसेच मद्य व्यवसाय सोडुन मध विक्री सुरु करण्याचे मनपरिवर्तन करकंब पोलीसांनी केले आहे.  करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.निलेश तारु यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री.महेश मुुंढे व श्री.अजित मोरे यांनी हातभट्टी दारु निर्मिती करणारे सोमनाथ अरुण काळे रा.खारेवस्ती, करकंब, ता.पंढरपुर यांचे मनपरिवर्तन करुन त्यांना हाॅटेल  व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे सोमनाथ अरुण काळे यांनी इतरांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. तसेच करकंब येथील महिला बचत गटाच्या सौ.सुनिता देशपांडे यांचे माध्यमातुन हातभट्टी दारु निर्मिती व विक्री करणारे महिलांचे बचत गट तयार केले. त्यांचे बॅंकेत बचत खाते उघडले व बचत गटाकडून कर्जरोखे घेवुन छोटे मोठे लघु व्यवसाय सुरु करण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी सपोफौ/शशिकांत कवितकर, पोहेकाॅ/कैलास हरिहर,पोना/दिपक लेंगरे, पोना/स्वप्निल वाघमारे, पोना/सचिन गावडे, पोना/सचिन गावडे, पोकाॅ/रमेश फुगे, पोकाॅ/अमोल घुगे यांनी कामगिरी केली.