Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

वाफळकर वस्ती, बार्डी ते रोपळे, पेहे ते नांदोरे रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची बहुजन ब्रिगेड ची मागणी..

बहुजन ब्रिगेड संघटनेचा बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा करकंब : सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ दिलीप स्वामी यांना  बहुजन ब्रिगेड संघ...

बहुजन ब्रिगेड संघटनेचा बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा

करकंब : सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ दिलीप स्वामी यांना  बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी निवेदन देवून वाफळकर ते रोपळे,बार्डी,ते नांदोरे,पेहे रस्त्याच्या निकृष्ट कामा बाबत  तसेच कामात मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे,तरी संबंधित कामाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या ठेकेदार व जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करून बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा दिला आहे.निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी निवेदन स्वीकारले यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,करकंब शहराध्यक्ष लखन शिंदे,महेंद्र शिंदे उपस्थित होते.

करकंब ता.पंढरपूर येथील वाफळकर वस्ती,रोपळे,बर्डी रस्ता व नांदोरे पेहे रस्ता या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी या रस्त्याची अवस्था झालेली आहे, तसेच या रस्त्याच्या कामात मटेरियल निकृष्ट दर्जाचे वापरले आहे.त्यामुळे या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचे दिसून येत आहे. सदर कामाची सखोल चौकशी करण्यात येवून जबाबदार असणारे अधिकारी व ठेकेदार यांनी शासनाच्या निधीचा योग्य प्रकारे वापर न केल्याचे दिसून येत आहे. तरी या रस्त्याच्या कामाची चौकशी तात्काळ करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असा इशारा बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी निवेदनात दिला आहे.