Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर,:- गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमासाठी प्राप्त झालेल्या दाव्यांना विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात येणार आहे. 10 डिसेंबर 2020 ते 6 ए...

सोलापूर,:- गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमासाठी प्राप्त झालेल्या दाव्यांना विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात येणार आहे. 10 डिसेंबर 2020 ते 6 एप्रिल 2021 या कालावधीत अपघातात मृत्यू पावलेल्या किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या वारसदारांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही 10 डिसेंबर 2020 ते 6 एप्रिल2021 या कालावधीसाठी खंडित झाली होती. मात्र 23 ऑगस्ट 2021 च्या शासन निर्णयानुसार वरील कालावधीतील प्राप्त विमा दाव्यांना विशेष बाब म्हणून तपासणीनंतर मंजुरी देण्यात येणार आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या अथवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या वारसदारांनी प्रस्ताव सादर केले नसल्यास संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मंडळ कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक यांच्याशी तत्काळ संपर्क साधून विहीत नमुन्यात कागदपत्रासह प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.