Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

गायिका सानिया पाटणकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

सानिया पाटणकर यांच्या गायनाला साथसंगत तबला आशय कुलकर्णी पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम माधव लिमये पुणे:-दीपावलीच्या पूर्वसंध्येला केशवबा...

सानिया पाटणकर यांच्या गायनाला साथसंगत तबला आशय कुलकर्णी पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम माधव लिमये

पुणे:-दीपावलीच्या पूर्वसंध्येला केशवबाग,कर्वेनगर येथे ‘अलाईव्ह’ प्रस्तुत ‘यमनरंग’ ह्या एका आगळ्यावेगळ्या मैफिलीचा अनुभव रसिकांनी घेतला.जयपूर-अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका सौ.सानिया पाटणकर आणि त्यांच्या प्रेरणा संस्थेच्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम सादर केला.

ह्या मैफिलीत यमन रागावरील विविध गानप्रकार सादर करण्यात आले. रागध्यानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर त्याला जोडून नोम तोम सहित धृपद,बामायना बंदीश,विलंबित व द्रुत ख्याल,पलटा,सरगमगीत,अभंग,प्रार्थना,नाट्यगीते,गझल तसेच भावगीत व चित्रपटगीते ह्यांचे सुंदर सादरीकरण झाले.कार्यक्रमाच्या शेवटी द्रुत एकतालात तराणा सादर करून मैफलीची सांगता करण्यात आली.

माहिती आणि मनोरंजन ह्या दोन्हीचा सुरेख मेळ सांधून मैफलीचे नियोजन करण्यात आले होते.त्यामुळे रसिकांना यमनचे विविध रंग अनुभवता आले.

डॉ.प्रीति सोहनी-बर्वे,वृंदा बाम,अदिती नगरकर,नितीन महाबळेश्वरकर,रुची,अंकिता,अपूर्वा,मधुरा,मयुरा,आहना,कपिल,संज्ञा ह्या विद्यर्थ्यांनी सुरेल आवाजात गानप्रस्तुती दिली.


हार्मोनियम वर माधव लिमये ,तबल्यावर आशय कुलकर्णी तर पखवाजावर श्री.ज्ञानेश्वर दुधाणे ह्यांनी साथसंगत केली.

सौ.पूनम गांधी ह्यांनी समर्पक निवेदन करून मैफिलीची रंगत वाढवली.